Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

40 वर्षांपासून थांबलेला रमाई नगर चा विकास नगर सेवक रामनरेश यादव भाऊ यांच्या कडून शुभारंभ

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8108166961/9860020016


चंद्रपूर :- रमाई नगर हे एक छोटीशी वस्ती चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनं समोर महाकाली कॉलरी रोड वरती बसलेली आहे आणि या वस्ती ला बसून 40 वर्षाहून अधिक वर्ष झाले असणार आणि या 40 वर्षात अनेक नगर पालिकेच्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या असणार अनेक नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आले असणार पण या रमाई नगर कडे एकाही नगर सेवकांने लक्ष दिले नाही आणि या रमाई नगर मध्ये कोणत्या समस्या आहेत हे कधी कोणी जाणून घेतले नाही पण या वेळी निवडून आलेले नगर सेवक श्री माननीय रामनरेश भाऊ यादव यांनी वस्ती मध्ये येऊन स्वतः जातीने लक्ष देऊन समोर उभे राहून वस्ती मधील समस्या समजून घेऊन रमाई नगर च्या विकास कामाला सुरवात केली सुरवातीला त्यांनी या रमाई नगरमध्ये नळाची पाईप लाईन टाकून दिली त्यानंतर जे सी पी बोलावून वस्ती मधील साफसफाई स्वतः उपस्थित राहून करवून घेतली त्यानंतर स्वतः जातीने लक्ष देऊन स्ट्रीट लाईट जे अतिशय गरजेचं होत ते पण त्यांनी एक विजेचा खांब लावून देऊन त्यावर लाईट लावून ते पण करून दिले आणि खुप दिवसापासून एक सिन्टेक्स आणून होती पण कोणी या वस्ती मधील सिनेक्स मध्ये पिण्याचे पाणी आणून टाकत नव्हते पण नगर सेवक रामनरेश भाऊ यादव यांनी पाणी विभागाशी चर्चा करून त्यांनी एक दिवसा आड पाणी आणून दिले व ते नियमितपणे सुरु देखील आहे या सर्व कामाना स्वतः जातीने लक्ष देऊन रमाई नगरच्या समस्या समजून घेऊन कामाना गती दिली आहे या कामाचे रमाई नगरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सर्व रमाई नगरच्या वासियांकडून श्री रामनरेश भाऊ यादव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आणि यापुढे ही या वस्तीतील नाल्याचे काम, रस्त्याचे काम, नळाच्या पाईप लाईन मधून पिण्याच्या सुविधा लवकरच करून देणार असे आस्वासन देखील त्यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments