Type Here to Get Search Results !

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतजमीन अधिग्रहणाच्या नावाखाली सुरू असलेला सरकारचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतजमीन अधिग्रहणाच्या नावाखाली सुरू असलेला सरकारचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. याविरोधात आयोजित भव्य शेतकरी परिषदेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हा उसळलेला जनक्षोभ म्हणजे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना मिळालेली चपराक आहे!

जमीन ही शेतकऱ्यांची आई आहे, तिचा सौदा होऊ देणार नाही!


विकासाच्या नावाखाली बळीराजाला त्याच्या हक्काच्या जमिनीवरून हुसकावून लावण्याचा डाव आखला जात आहे. आजच्या परिषदेत एका वयोवृद्ध माऊलीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तिचा संताप पाहूनही जर सरकारचे डोळे उघडत नसतील, तर या सत्तेला अंधेरी नगरी म्हणायचे नाही तर काय?


जनतेच्या मतांवर निवडून यायचे आणि संकटाच्या काळात मात्र पाठ फिरवायची, या लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून संतप्त शेतकऱ्यांनी क्षेत्र आमदारांविरोधात थेट गावबंदीचा ठराव पारित केला आहे. हा लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर जनतेने दिलेला सर्वात मोठा इशारा आहे


या परिषदेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेला धडक मोर्चा ही तर फक्त सुरुवात आहे. जर सरकारने तातडीने हे जमीन अधिग्रहण रद्द केले नाही, तर हा वणवा संपूर्ण जिल्ह्यात पेटल्याशिवाय राहणार नाही.

ज्या शेतकऱ्याच्या बळावर हे सरकार सत्ता उपभोगत आहे तोच बळीराजा जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा मोठमोठ्या सत्ताधीशांची सिंहासने डळमळीत होतात.

Post a Comment

0 Comments