Type Here to Get Search Results !

चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील प्राचीन हनुमान मंदिराला माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील प्राचीन हनुमान मंदिराला भेट देत महाबली हनुमानजींचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले.बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. श्रद्धा, संस्कार आणि इतिहासाचा सुगंध लाभलेल्या या पावन स्थळी उभे राहिल्यावर मन भावविश्वात हरवून गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी स्पंदन पावलेल्या या मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पुनर्बांधणीचा संकल्प अधिक दृढ झाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.


या पाहणी दौऱ्यावेळी मंदिर परिसरातील भगवान महादेव मंदिराचे नूतनीकरण, सभागृह उभारणी तसेच भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधांचा समावेश असलेला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. येत्या काळात या पवित्र स्थळाला नवचैतन्य आणि नवसंजीवनी देण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. श्रद्धा, इतिहास आणि विकास यांचा सुंदर त्रिवेणी संगम घडवत या मंदिराच्या वैभवाला नवी झळाळी देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त  केला यावेळी भिवापूर वार्डातील समस्त नागरिकानी आपआपली उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments