Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विजय मुसळे सर यांनी संकलन केलेल्या ‘दिमाखवाला’ या पुस्तकाचे विमोचन



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज विजय मुसळे सर यांनी संकलन केलेल्या ‘दिमाखवाला’  या पुस्तकाचे विमोचन झाले. 

प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हे पुस्तक विकत घ्यावे. 

  जशी शरीराच्या स्नायूना बळकट करण्यासाठी व्यायाम लागतो त्याचपद्धतीने मेंदूला योग्य आकार देण्यासाठी बौद्धिक कसरत करणे आवश्यक आहे. डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांच्यात कनेक्शन व संवाद वाढविण्यासाठी काही मजेशीर उपाय या पुस्तकात समाविष्ट केले आहेत तसेच विविध उपयुक्त एक्टिव्हिटीज मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी त्यात समाविष्ट केलेल्या आहेत. सर्व वयोगटातील व्यक्ती याचा फायदा घेऊ शकतात. 

म्हातारपणी बुद्धिभ्रंश तसेच अल्झिमर्स या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी ह्या गोष्टी फायदेशीर ठरतात. या विमोचन कार्यक्रमा च्या वेळेस अभिलाषाताई गावतुरे व महानगर पालिकेचे नगर सेवक, स्थायिसामिती सभापती गिऱ्हे ताई, राहुल पावडे, व अन्य मान्यवर आणि चंद्रपूर येथील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments