Type Here to Get Search Results !

मान्सून पूर्वतयारी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय सैन्याच्या पथकाकडून पूरबाधित स्थळांच मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य -- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


परभणी, दि. 25 : - आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक पूर्वतयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने भारतीय सैन्याच्या 54 मीडियम रेजिमेंट, छत्रपती संभाजीनगर येथील मेजर अमित सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परभणी जिल्ह्यात भेट देऊन संभाव्य पूरबाधित स्थळांची रेकी केली.


जिल्हाधिकारी कार्यालयात आज  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी पथकाशी चर्चा करून जिल्ह्यातील पूरप्रवण भाग, मागील वर्षांतील पूरस्थिती, संवेदनशील गावे, नदी-नाल्यांची स्थिती तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक समन्वयाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने शोध व बचाव कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळ, उपकरणे आणि प्रतिसाद यंत्रणा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले की, मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि भारतीय सैन्य यांच्यात समन्वय ठेवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सज्ज राहण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

या प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, तसेच भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.

मेजर अमित सक्सेना यांच्या पथकाने जिल्ह्यातील पूरबाधित व पूरप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून भौगोलिक परिस्थिती, पोहोच मार्ग, बचाव कार्यासाठी आवश्यक पर्यायी मार्ग, संवेदनशील क्षेत्रे तसेच आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेतला. या रेकीमुळे संभाव्य आपत्तीच्या काळात त्वरित आणि समन्वयित प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.

Post a Comment

0 Comments