मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
अमरावती, दि. 25 : - जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन' साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. रुपिकेश होले, भावना पुरोहित, प्रमोद भक्ते, सुनील कळतकर, विशाल झामरे, सायली डंभे उपस्थित होते.
डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने आणि भावना पुरोहित यांनी 'स्झिझोफ्रेनिया' या गंभीर मानसिक आजाराविषयी मार्गदर्शन केले. आजाराची लक्षणे, त्याचे वेळेवर निदान कसे करावे आणि उपलब्ध उपचार पद्धती कोणत्या आहेत, याबाबत माहिती दिली. विशाल झामरे यांनी सूत्रसंचालन केले. सायली डंभे यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments