Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली : -  केंद्रीय आदिवासी मंत्र्यांच्या सूचनेनुसार गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गेवर्धा येथील आदिवासी आश्रम शाळेच्या बांधकामस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. आदिवासी मुलामुलींसाठी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या एकलव्य इंग्रजी माध्यम निवासी शाळेच्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.


गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासोबत सर्व आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी शाळेचे बांधकाम उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी दिले.


 या प्रकल्पामुळे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, सी.पी.डब्ल्यू.डी.चे अभियंते तसेच बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments