Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महिला व बालविकास विभागाचे कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर




 महिला व बालविकास भवन निर्माण करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर 


 यासंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठक घेऊन आढावा घेतला. 


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


मुंबई :- राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांत महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यापैकी १८ ठिकाणी जागा विभागाच्या ताब्यात मिळाली असून अकोला, अमरावती, यवतमाळ, जळगाव, वाशिम, परभणी या ६ ठिकाणी महिला व बालविकास भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सदर महिला व बालविकास भवनांमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, वुमेन हेल्पलाइन कक्ष, जिल्हा बाल संरक्षण कार्यालय, बाल हक्क आयोग, महिला आयोग, समुपदेशन केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी यंत्रणांची कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा महिला व बालविकास विभागाचा संकल्प आहे. राज्यातील महिलांच्या व बालकांच्या उत्तम सेवेसाठी लवकरात लवकर राज्यातील सर्व महिला व बालविकास भवनांची निर्मिती पूर्ण करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments