Type Here to Get Search Results !

माविम आढावा बैठक आणि 'सावली वर्किंग वुमन हॉस्टेल' बाबत बैठक




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


मुंबई :- महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित, हक्काचे वातावरण निर्माण करणे यावरच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. याच उद्देशाने माविम च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयीन दालनात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत 'माविम'च्या विविध योजना, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि त्यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेतला. यासोबतच, मुंबईतील अंधेरी येथे साकारत असलेल्या "सावली वर्किंग वुमन हॉस्टेल" च्या बांधकामाची देखील सविस्तर माहिती घेतली.


यावेळी, बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका राजलक्ष्मी शाह तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments