Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले; नागरिक त्रस्त, नगर पंचायत मात्र झोपेच्या सोंगेत...?




माहूर प्रतिनिधी

आदित्य खंदारे 


माहूर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही नगर पंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


रस्त्यावरील नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी चिखल व दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते. वारंवार सांगूनही नगर पंचायत केवळ आश्वासने देते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही.”


नागरिकांनी तात्काळ नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आता तरी नगर पंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Post a Comment

0 Comments