Type Here to Get Search Results !

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर याची पाहणी




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :-  सविस्तर माहिती असे आहेकी चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था बघून प्रशासनाला कडक सूचना मागच्या पाहणी दरम्यान दिल्या होत्या. त्या अनुषंगाने १५ दिवसानंतर पुन्हा रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता, प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. गेल्या १५ दिवसांत प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे रुग्णालयातील स्वच्छता, सीटी स्कॅन (CT Scan), एक्स-रे (X-Ray) सुविधा आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यांसारख्या मूलभूत बाबींमध्ये सुमारे ८०% सुधारणा झाली. सामान्य रुग्णांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही पावले उचलली जाणे स्वागतार्ह आहे. 


मात्र, अद्यापही काही तांत्रिक अडचणी शिल्लक असून त्यादेखील तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रसंगी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला १००% दर्जेदार उपचार मिळत नाहीत, तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील. असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments