Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पं. दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूर येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :-  सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची आणि उपलब्ध सोयी-सुविधांची सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे हे कॅन्सर हॉस्पिटल आता यशस्वीरीत्या कार्यान्वित झाले आहे की नाही ते बघितले व सगळ्या सुविधा बघून एक वेगळा आनंद व्यक्त केला.


खासदार ताईने यावेळी म्हटले की टाटा ट्रस्टच्या सहकार्याने येथे जागतिक दर्जाच्या मशिनरी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भेटीदरम्यान हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचार पद्धती, डायग्नोस्टिक सेंटर आणि रुग्णसेवेचा दर्जा जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांना आता उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही तर आपल्या चंद्रपुरातच आता जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. अशी आशा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments