✍️भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847
भंडारा :( दिनांक२१ में ) भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून परतत असताना हा अपघात घडला. साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिविल विभागाचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मोहाडी तालुक्यात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास ही व्हिजिट संपवून दोघेही दुचाकीनं साकोलीकडे परत येत असतांना हा अपघात झाला. दरम्यान, एकाच वेळी दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
*भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला*
हा भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला. वळण मार्गावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्यानं त्यांची भरधाव दुचाकी रस्त्या शेजारील एका मोठ्या झाडावर थेट जाऊन आदळली. दुचाकीचा वेग जास्त असल्यानं हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावं कुणाल गोटेफोडे ( वय २१ वर्षे) आणि महेश टांगशेलवार (वय २२ वर्षे) अशी आहेत. मृत कुणाल हा गोंदिया जिल्ह्यातील सौंदळ येथील रहिवासी असून महेश हा भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिकना तावशी या गावातील आहे. साकोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments