Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची चंद्रपूर येथे विविध ठिकाणी भेटीगाठी




मजहर खान 

चंद्रपुर शहर प्रतिनिधी 

9322611037



चंद्रपुर :- आज चंद्रपूर येथे विविध ठिकाणी भेट देत भेटीगाठी घेतल्या त्यात मुल रोड परिसरातील इंदिरानगर येथे श्री नंदू पारखी यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. तसेच इंदिरानगर येथील मरहूम चांद शेख यांच्या परिवाराचीही भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झालो. यावेळी परिवारातील सदस्यांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले तसेच या कठीण प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत अशी भावना व्यक्त केली. या दुःखाच्या क्षणी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.


त्यानंतर श्री गुड्डू मोरया यांच्या घरी सदिच्छा भेट देत आपुलकीने संवाद साधला. तसेच कृष्णा नगर येथील श्री शामराव बोडे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी परिवारातील सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा करत त्यांच्या भावना व अपेक्षा जाणून घेतल्या. समाजातील आपुलकी, संवाद आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा भेटी नेहमीच प्रेरणादायी ठरतात.

Post a Comment

0 Comments