Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

"रोबोटिक बोयो" ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..! : विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


रायगड-अलिबाग,दि.22 :- पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या "रोबोटिक बोयो" जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल या येथील नागाव बीच येथे आज सकाळी उपस्थित होत्या. यावेळी रोबोटिक बोयोच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, "रोबोटिक बोयो" ठरतोय खऱ्या अर्थाने जीवन रक्षक..!

    याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ.रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

    या भेटीच्या वेळी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाला बीचवरील सोयीसुविधा तसेच शौचालयांची संख्या वाढविण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांची माहिती आपल्याकडे संकलित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments