मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर : - सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या जगातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या अल्ट्रा मॅन स्पर्धेत ‘अल्ट्रा मॅन’ हा मानाचा किताब पटकावून चंद्रपूरच्या डॉ. प्राजक्ता अस्वार यांनी इतिहास रचला. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देतानाच जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी जागतिक स्तरावर चंद्रपूरचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. आज त्यांच्या रुग्णालयात भेट घेऊन बांबूपासून निर्मित तिरंगा झेंडा, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी चंद्रपूरच्या महापौर संगीताताई खांडेकर, महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे, राजू गोलीवार, प्रकाश धारणे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments