Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पाचपावली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. अनिरुद्ध पुरी सर यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे स्वागत




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर : - पाचपावली पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक माननीय श्री. अनिरुद्ध पुरी सर यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, विदर्भ यांच्यातर्फे आज पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. 

या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यपद्धतीची व रुग्णसेवेची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षकांना देण्यात आली. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणताही अपघात झाल्यास जखमींना तातडीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व शासकीय रुग्णालयांमार्फत उत्तम उपचार कसे मिळवून देता येतील, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. 

अपघाताच्या घटनास्थळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे 'आरोग्य दूत' तात्काळ उपस्थित राहून रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. 

*'रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा'* या ब्रीदवाक्यानुसार कार्य करणाऱ्या कक्षातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपत्कालीन परिस्थितीत फक्त एक फोन करा आणि तत्पर आरोग्यसेवा मिळवा. 

या स्वागत कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख श्री. प्रवीण लता बालमुकुंद शर्मा, शहर प्रमुख श्री. कपुर सिंग, पश्चिम विधानसभा संघटक श्री. अजय नवलकर तसेच रुग्णसेवक सर्वश्री विक्रम सिंग बावरी, जगतार सिंग बावरी, अर्जुन सिंग बावरी व जगतसिंग बावरी आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments