मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :-सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने शहरातील विविध भागात सुरू असलेली पावसाळापूर्वीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच पावसाळ्यात नागरिकांना मदत करण्यासाठी मदत यंत्रणा, आपत्कालीन परिस्थिती उद्भाल्यास आवश्यक ती यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिल्या.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सोमवारी(ता.२५) पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. आयुक्त सभाकक्षात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री.अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., प्र. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार,उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री. गणेश राठोड, श्री. अशोक गराटे, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपगार यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments