मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नांदेड दि. 25 मे :- नांदेड विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षीक निवडणूक-2026 निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना अवलंब करावयाची कार्यपद्धीतीबाबत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश 22 मे 2026 रोजी निर्गमीत केले आहेत.
या निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना कार्यालयाच्या 100 मीटरच्या बाहेर वाहने व मिरवणूक थांबवावी. वाहनांच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटार गाड्या, वाहनांना तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारासोबत सुचक, अनुमोदक अथवा दोन व्यक्ती असे तीन पेक्षा जास्त व्यक्तींना तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील नांदेड विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षीक निवडणूक-2026 निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या हद्दीपर्यंत 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 जून 2026 रोजी 24 वाजेपर्यंत अंमलात राहील.

Post a Comment
0 Comments