मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
रायगड :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी ७ जणांची ५ पथके तयार केली आहेत. यात एनडीआरएफ ची सुद्धा मदत घेतली जात असून इतर स्वयंसेवी बचाव पथके सुद्धा मदत करीत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments