मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
गडचिरोली :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानादरम्यान जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेले माओवादी साहित्य शोधून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
माओवादी घातपात, नक्षल सप्ताह, निवडणूक काळातील कारवाया व सुरक्षा दलांवर हल्ल्यांसाठी वापरले जाणारे शस्त्र व स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीसांनी उद्ध्वस्त केले.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता अखेरच्या टप्प्यात असून, पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शांतता व सुरक्षिततेचा नवा अध्याय निर्माण होत आहे.

Post a Comment
0 Comments