Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी टँकर मंजूर




 मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


बुलढाणा दि.21 :-  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.


निमखेड येथे 570 पशुधन व 910 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 23 हजार 840 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments