✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास दादर प्लाझा टॉकीज जवळ बेस्ट बस चा भीषण अपघात झाल्याची दुःखद घटना घडली असून, अपघातात 2 जणांचा प्राण गेला असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांकडून समजते.
दादर हा सर्वात वर्दळीचा भाग समजला जातो, सकाळ पासून ते रात्री पर्यंत, नोकर दार पासून, धंदेवाल्यापर्यंत अत्यंत वर्दळीचा भाग असून, त्यात अशी घटना घडणे हे दुर्दयी आहे. सविस्तर माहिती अशी कि सकाळी 9:30 वा बस धारावी कडून दादर च्या दिशेने येताना, चालकाचा स्टेरिंग वरून ताबा सुटल्याने बस पुढील 4 वाहनांना धडक बसल्याचे समजते.
अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते तर काही प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना तात्काळ सायन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, अपघातात बऱ्याच वाहनांचं प्रचंड नुकसान झाले असून काही दुचाकी सुद्धा समावेश आहे.
दादर प्लाझा टॉकीज जवळ अपघात झाल्याने तिथली प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने, नोकरदार वर्गाला त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते. घटना स्थळी पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास करण्यात येइल असे सांगण्यात आले.
बेस्ट बस चे अपघात हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही, अशा अनेक घटना मुंबईत वर्दळीच्या ठिकाणी घडल्या आहेत, त्यात मुंबईकरांचे नाहक प्राण गेलेत, आणि त्यात ही घटना ताजी असताना, बेस्ट प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, अजून किती बेस्ट प्रशासन मुंबईकरांचे बळी घेणार असे मुंबईकर यांना पडलेला प्रश्न आहे, बेस्ट प्रशासन आता या अपघाताची दखल घेणार का, असा सवाल नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments