Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात ८ जून २०२६ रोजी दोन कारवाया दरम्यान एकूण २४ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा औषधसाठा जप्त




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


पुणे : - कोल्हापुरातील रविवार पेठ परिसरातील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि. येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शन्सचा साठा आढळून आला.


पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मे. सिप्ला फार्मा अॅण्ड लाइफ सायन्सेस लिमिटेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी 'रेक्टीन प्लस टॅब्लेट' या शेडयूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात केल्याचे आढळून आले.


औषध उत्पादक व विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांविरुद्ध कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा अनियमिततेची माहिती प्रशासनाला तात्काळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments