मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. 21) यशवंत स्टेडियमवर योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मनपाच्या पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विशेष स्वच्छता अभियानाचा समारोपही याच कार्यक्रमात होणार आहे. त्याअनुषंगाने मनपातर्फे सामूहिक योग कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून, कार्यक्रमाची पूर्वतयारी, स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात मनपा अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौरांनी दरवर्षीप्रमाणे मेट्रो सेवा आणि आपली बसची सेवा सुनिश्चित करण्याचे निर्देश तसेच नागरिकांनी कार्यक्रमासाठी मोठ्यासंख्येत नोंदणी करीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा सभापती श्रीमती दर्शनी धवड, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त श्री.मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. राजेश भगत, डॉ.मेघना वासनकर, श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, नगररचना उपसंचालक श्री.गिरीश गोडबोले, सहायक संचालक श्री. ऋतुराज जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर, सहायक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, विजय थूल, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, विकास रायबोले, नरेंद्र बावनकर, घनश्याम पंधरे, वृक्ष संवर्धन श्री.अमोल चौरपगार यांच्यासह जनार्दन स्वामी मंडळ, एनसीसी, सीआरपीएफ, स्काऊट गाईडचे प्रतिनीधी यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सामूहिक योग सत्रात सहभागी होण्याकरिता नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी https://yoga-census-portal.emergent.host या लिंकवर जाऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे

Post a Comment
0 Comments