मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी रोजगारनिर्मिती हा महत्त्वाचा पाया आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात सहभागी होत ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’बाबत मार्गदर्शन केले.
ही योजना युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच प्रथमच नोकरी करणाऱ्या तरुणांना आर्थिक प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या अनेक युवकांना नियुक्ती पत्र वितरण करण्यात आले. नव्या रोजगाराच्या संधीमुळे युवकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि आनंद हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात या योजनेमुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. स्थानिक उद्योग, उद्योजक आणि व्यावसायिक संस्थांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेत युवकांसाठी नव्या रोजगार संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment
0 Comments