Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महाराष्ट्रकन्येची प्रेरणादायी गगनभरारी !




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


रोहा :- रोहा तालुक्यातील चिंचवली येथील सपना राजेश वाघमारे हिने आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. अत्यंत मेहनतीने रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली वकील होण्याचा बहुमान तिने मिळवला. आता तिची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्विन मेरी युनिव्हर्सिटी येथे निवड झाली आहे. या उज्वल व प्रेरणादायी यशाबद्दल आज मंत्रालयात तिचा सत्कार केला.


उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजातील वंचित आणि पीडित महिलांच्या हक्कांसाठी कार्य करण्याचा सपनाचा निर्धार आहे. सपनाच्या या जिद्दीचे आणि यशाचे कौतुक करत तिला परदेशी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही  बालकल्याण मंत्री अदीतीताई तटकरे यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments