Type Here to Get Search Results !

वैनगंगेत बोट उलटली , सातपैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू !




✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847


भंडारा :( दिनांक ८ जून २०२६ ) वैनगंगा नदीतील करचखेडा बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांची नाव परतीच्या प्रवासात उलटली. यात दोन तरुणांचा बुडून अंत झाला तर पाच जण पोहून काठावर आले. 

कृष्णा जगन्नाथ बोकडे (२६ वर्षे, रा. चांदणी चौक, भंडारा) आणि पवन मुरली चौबे (३४ वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा) अशी मृत तरुणांची नावे आहे. यापैकी बोकडे याचा मृतदेह सोमवार सकाळी ११ वाजता आढळला तर दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे.


*नदीतील बेटावर अंघोळीसाठी गेले*

माहितीनुसार, करचखेडा (ता. भंडारा) येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता सात तरुण नदीतील एका बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यामध्ये कृष्णा जगन्नाथ बोकडे (२६ वर्षे, रा. चांदणी चौक, भंडारा), आकाश केवट (२७ वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा), सुबोध विलास ढोक (२६ वर्षे, रा. सेद्री बुजुर्ग, ता. पवनी), काशीनाथ फत्तू मेश्राम (३२ वर्षे, रा. जुना करचखेडा), पवन मुरली चौबे (३४ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, भंडारा), मृणाल बाळकृष्ण मंदुकर (२० वर्षे, रा. गांधी चौक, भंडारा) आणि अर्जुन मोतीराम मेश्राम (२९ वर्षे, ह.मु. आंबेडकर वार्ड, भंडारा) यांचा समावेश होता.


*परत येताना बोट उलटली*

सायंकाळी अंघोळ आटोपून सर्वजण त्याच बोटीने परत येत असताना नदीच्या मध्यभागी अचानक बोट उलटली. या दुर्घटनेत पवन मुरली चौबे आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे हे दोघे नदीच्या पाण्यात बुडाले. मात्र इतर पाच युवकांनी प्रसंगावधान राखत पोहत नदीकाठ गाठला आणि आपला जीव वाचविला.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून नदीत बुडालेल्या दोन्ही युवकांचा शोध  घेण्यास युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. कृष्ण बोकड्याचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments