मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
बीड (रंजेगाव):- रंजेगाव येथील पीडित सुवर्णमाला बनसोडे या महिला घरी एकट्या असताना रात्री काही गावातील तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली, दगडफेक केली व घरासमोर पत्ते खेळत बसले होते. यास विरोध करत “घरासमोर पत्ते खेळू नका, लघुशंका करू नका, दगडफेक करू नका” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत टांभी, बेल्ट, काठी व चप्पलने न दाखवायला येणाऱ्या जागेवर अमानुष मारहाण केली.
या हल्ल्यात पीडित महिलेच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले, तसेच त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले व १५ वर्षीय मुलाला बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली.
घडलेला सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे.
जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे दाखल करण्यात आले आहे.
पीडितांची ठाम मागणी :
✅ सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी
✅ कठोर कायदेशीर कारवाई करावी
✅ पीडित कुटुंबाला न्याय द्यावा
दलितांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत.
न्याय मिळालाच पाहिजे असे महाराष्ट्र भर मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments