Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मनपाद्वारे हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाद येथे होणाऱ्या १०४ व्या उर्सच्या दरम्यान पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला आढावा




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की मनपाद्वारे हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाद येथे होणाऱ्या १०४ व्या उर्सच्या दरम्यान पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी(ता.३०) आढावा घेतला. 

ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती तसनीम परबीन नियामत खाने ताजी, पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिका राव एन, मनपाचे उपायुक्त श्री राजेश भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री तुषार बारहाते, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, श्री. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले,  हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव श्री. ताज अहमद(राजा) यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments