Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

निमसाखर मध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी.




इंदापूर तालुका प्रतिनिधी    गणेश धनवडे 


इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपोर्णिमा साजरी करण्यात आली. या पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरामधून स्वामींच्या पालखीची गावातून ग्रामप्रदर्शना काढण्यात आली. यासाठी महादेव भजनी मंडळांनी सहकार्य केले तसेच सर्व स्वामीभक्त महिलांनी आपापल्या दारात व चौका चौकात रांगोळी काढून स्वामींच्या पालखीचे स्वागत केले .पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर ह.भ.प. रमेश महाराज कट्टे वालचंदनगर यांचे स्वामी चरित्र प्रवचन झाले. नंतर श्री स्वामी समर्थांचा जप व आरती घेण्यात आली. तसेच पालखीची सजावट  श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली  होती. तसेच मंदिरातील रांगोळीची सेवा सौ शितल सुनील टकले यांनी केली.  त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना श्री महेश सुभाष माने यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमास वालचंदनगरचे स्वामी भक्त श्री राम कुंभार सर आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व स्वामीभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments