मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर : - सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की बाबूपेठ येथील बालाजी मंदिर परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या चितळ (चित्तर) प्राण्याचा जीव भाजपा कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे व वन विभागाच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाचला.
भाजपा कार्यकर्ते मनीष पिपरे, शुभम बोडाले व यश निखारे, सुशांत कातकर, सचिन कुमरे यांनी परिसरात जखमी अवस्थेत पडलेल्या चितळ प्राण्याची माहिती मिळताच तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, या दिवशी मनीष पिपरे यांचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत जखमी वन्यप्राण्याला मदत करण्यासाठी प्रयत्न केले.
मनीष पिपरे यांनी ही बाब माजी नगरसेविका सौ. कल्पनाताई बगुलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कल्पनाताईंनी तात्काळ माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधून वन विभागाला माहिती दिली व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तसेच इको-प्रो संघटनेचे सदस्य अभय अमृतकर यांनीही वन विभागाशी संपर्क साधून बचाव कार्यासाठी सहकार्य केले.
माहिती मिळताच वन विभागाच्या बाबूपेठ क्षेत्रातील अधिकारी सौ. प्रियंका जावळेकर या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची टीम तात्काळ पोहोचली व जखमी चितळाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी वन विभागाच्या वाहनातून रवाना करण्यात आले.
या यशस्वी बचाव मोहिमेमुळे माजी नगरसेविका सौ. कल्पनाताई बगुलकर यांनी माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, एको प्रो संघटनेचे अभय अमृतकर, भाजपा कार्यकर्ते मनीष पिपरे , शुभम बोडाले, यश निखारे, सुशांत कातकर, सचिन कुमरे व वनविभागाच्या सौ. प्रियंका जावळेकर तसेच वन विभागाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी नंदकिशोर बगुलकर, निखिल देवगडे, स्वप्नील शेंडे तसेच परिसरातील नागरिकांनीही बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले.
समाजातील नागरिकांनी जखमी अथवा संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांची माहिती तत्काळ वन विभागाला देऊन अशा संवेदनशील कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यावेळी केले.

Post a Comment
0 Comments