Type Here to Get Search Results !

नदी संवर्धनातून पर्यावरणपूरक विकास..!: आमदार किशोर भाऊ जोरगेवार




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर : - सविस्तर वृत्त असे आहे की आज मनपा आयुक्त श्री. नरेश अकुनुरी यांच्यासोबत माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी इरई नदी खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शहर अभियंता रवींद्र हजारे, उप अभियंता आशिष भारती तसेच पर्यावरण व निसर्ग अभ्यासक डॉ. योगेश दूधपचारे, प्रा. डॉ. सचिन वझलवार,माजी नगरसेवक बलराम डोडाणी आणि श्याम हेडाऊ उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई व झरपट नदीच्या संगमस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि विविध तांत्रिक बाबींवर चर्चा केली. नदी संवर्धनासोबतच या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि पर्यावरणीय महत्त्व जपत भविष्यात हा परिसर नागरिकांसाठी निसर्गस्नेही विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत सकारात्मक विचारमंथन ही आमदार किशोर भाऊ यांनी व्यक्त केले. 

चंद्रपूरकरांना स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नदीकाठ उपलब्ध व्हावा, तसेच शहराच्या विकासासोबत निसर्गाचे जतन व्हावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना आमदार किशोर भाऊ यांनी प्रशासनाला  दिले . व त्यांनी समोर म्हटले की नदी संवर्धन आणि शाश्वत विकासाचा समतोल साधत हा परिसर शहराच्या नव्या ओळखीचे आकर्षण ठरेल, असा विश्वास आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments