मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
नवी मुंबई :- महानगर पालिकेत महासभेदरम्यान विधी अधिकारी मा. अभय जाधव यांचा निलंबन करण्यात आल्याची बातमी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांना समजले असता या प्रकरणी त्यांनी माहिती घेतली असता सदर अधिकाऱ्यावर जातीवादी मानसिकतेतून कारवाई झाल्याची बाब लक्षात येताच आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा. कैलास शिंदे यांना निलंबनाची कारवाई रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
वाजतागायत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला नाही. म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये विशेष चर्चा घडवून येत्या 15 दिवसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्यावतीने पुतळा बसवण्यात येईल असा इशारा यावेळी आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष दीपक बाणाईत, उपाध्यक्षा सुरेखाताई वानखेडे,सचिव कविताताई हिवाळे, संदेश हत्तरगे, पल्लवीताई शिंदे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments