Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली :- गोपनीय माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांनी ब्राम्हपुरी–देसाईगंज मार्गावर सापळा रचून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली.


पोलीस पथकाने संशयित सिल्वर रंगाची मारुती सुझुकी रिट्झ (MH 20 BC 8161) वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.


या प्रकरणी वाहन चालक अमन अभिमन अलोने (वय 23 वर्षे), रा. मातावार्ड, ता. देसाईगंज यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.


अवैध व्यवसायांविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कारवाई सातत्याने सुरू असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments