Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राजाराम ग्रामपंचायत मध्ये हातपंम्प बंद अवस्थेत ग्रामपंचायत चे दुरुस्तीकडें जाणूनबुजून दुर्लक्ष.




व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 


मो ,9209982212


  अहेरी  राजाराम अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येते  वार्ड क्र. मधील श्री. मनोज सिडाम यांच्या घराजवळील हातपम्प बंद अवस्थेत असून ग्रामपंचायत ला वारंवार सांगून पण हातपंप नादुरुस्त आहेत.विशेष म्हणजे  हातपंम्प बंद असून याकडे ग्रामपंचायतची दुर्लक्ष होत आहे. तसेच हर घर नळ यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्फत जिल्हा परिषद कडून कोटी रुपये खर्च करून गेल्या वर्षी पाण्याची टाकी बांधण्यात आली व पंधव्या वित्त आयोगातून खर्च करून धातूरमातूर प्रत्येक घराला नळ जोळणी केले मात्र ते शुद्ध पाणी नागरिकांना मिळाले नसून आज एक दोन महिन्या पासून हातपंम्प बंद आहेत, यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असताना याकडे ग्रामपंचायत कडून कानडोळा करीत सरस दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्वरित बंद असलेले हातपंम्प दुरुस्त करावी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments