Type Here to Get Search Results !

क्षणिक राग ठरला जीवघेणा , संतापलेला मुलाने डोक्यावर फावडे मारून वडिलांना संपवले!




मध्यस्थी करणाऱ्या पुतण्यालाही मारहान


आरोपीचे पोलीसांसमोर आत्मसमर्पण ।


✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो.नं.8888519894


भंडारा : घरी बाथरूम आणि संडासाच्या बांधकामावरून बापलेकात वाद झाला. तो एवढा विकोपाला पोहोचला की संतापाच्या भरात मुलाने चक्क वडिलांच्या डोक्यावर फावड्याने वार केला. वार वर्मी बसल्याने रक्तबंबाळ झालेल्या वडिलांनी घटनास्थळीवरच जीव सोडला. या वादात मध्यस्ती करणाऱ्या पुतण्यालाही मारहाण केली. ही घटना तुमसर तालुक्यातील खरबी येथे शुक्रवारी (दि.२९) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.


या घटनेतील मृत वडिलाचे नाव तुकडू बावणे ( वय६० वर्षे ) असे असून गणेश तुकडू बावणे ( वय३३ वर्षे ) असे मुलाचे नाव आहे घटनेनंतर पोलिसांनी गणेशला अटक केली. या रक्तरंजित घटनेमुळे खरबीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वडील व मुलगा हे दोघेही एकाच घरात राहत होते. शुक्रवारी रात्री संडास-बाथरूमच्या बांधकामाच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद काही वेळातच तीव्र स्वरूप धारण करत कडाक्याच्या भांडणात परिवर्तित झाला. वादाच्या भरात संतापलेल्या गणेशने बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या फावड्याने वडील तुकडू बावणे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे तुकडू बावणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


दरम्यान, वाद मिटविण्याचा प्रयत्न करणारा आर्यन आनंद बावणे ( वय१५ वर्षे ) या पुतण्यालाही त्याने थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे सांगण्यात आले.


*आरोपीचे पोलिसात आत्मसमर्पण*

घटनेनंतर आरोपी गणेश बावणे याने घटनास्थळावरून पळ काढून थेट मोहाडी पोलिस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. आपण भांडणात वडिलांचा खून केल्याचे सांगताच पोलिसही अवाक झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले, त्यानंतर घटनास्थळ गाठले.

Post a Comment

0 Comments