मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
मुंबई :- सरकारने जाहीर केलेली “बळीराजाच्या हक्कासाठी एल्गार... अन्नदात्याचा” या आक्रोश मोर्चाचे आयोजकर्जमाफी ही फसवी असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली “बळीराजाच्या हक्कासाठी एल्गार... अन्नदात्याचा” या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मा. आमदार रोहितदादा पवार यांनी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सर्व आंदोलक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात २२ जून रोजी चर्चा करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करत कोणतीही चर्चा केली नाही, तसेच कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही.
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारने मते मिळवली आणि सत्तेत आल्यानंतर त्या योजनेतील लाभार्थी कमी केले, त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून त्यामध्ये जाचक अटी व निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचे पाप महायुती सरकार करत आहे.

Post a Comment
0 Comments