Type Here to Get Search Results !

सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाम पाठपुरावा!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) वारसांना लाईड-पागे समिती व शासन निर्णयानुसार तातडीने सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी नगरविकास राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरीताई मिसाळ यांना सविस्तर निवेदन सादर केले.


यावेळी वारसांना देण्यात आलेल्या अन्यायकारक नोटिसा तात्काळ रद्द करणे, शासन व न्यायालयीन निर्णयानुसार समान लाभ लागू करणे, सेवेत तातडीने नियुक्ती देणे, वयोमर्यादेनुसार प्राधान्य, शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग-३ मध्ये नियुक्ती, नियुक्ती प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच संपूर्ण प्रक्रियेसाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.


या विषयावर लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही मागणी राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच, आंदोलक प्रतिनिधींचे मा. राज्यमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संभाषण करून देत त्यांच्या मागण्या प्रत्यक्ष मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.


सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळावा आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही सुरू राहील.

Post a Comment

0 Comments