मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर :- महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
त्यानंतर कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली. महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पूर्ण ताकदीने एकवटला असून, कार्यकर्त्यांचा हा अथांग उत्साह आगामी काळात ऐतिहासिक विजय निश्चित करेल, हाच दृढ विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त झाला.
याप्रसंगी काँग्रेस नेते व आमदार मा. श्री. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री मा. श्री. रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते श्री. संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष श्री. शिवा राव, श्री. विनायक बांगडे, श्री. सुभाष गौर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments