Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. अरुणजी लखानी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. अरुणजी लखानी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी उपस्थित राहून श्री. अरुणजी लखानी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख म्हणून  मा. श्री. पंकजजी_भोयर साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. मा. श्री. अशोकजी_उईके साहेब, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराज भैय्या अहिर, आमदार श्री. देवराव_भोंगळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि पक्षाच्या विचारांना अधिक बळ देण्यासाठी श्री. अरुणजी लखानी यांचे नेतृत्व निश्चितच मोलाचे ठरेल, असा विश्वास आहे.

श्री. अरुणजी लखानी यांना आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व भरघोस यशासाठी सदिच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments