Type Here to Get Search Results !

मनपाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयालगत अवैध बांधकाम

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 



 चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयापासून अवघ्या २५ मीटर अंतरावर जामा मशिदीशेजारी अवैध बांधकाम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम सुरू असतानाही महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


 शहरात एखाद्या गरिबाने किरकोळ स्वरूपाचे अवैध बांधकाम केल्यास महानगरपालिका तत्काळ कारवाई करते. मात्र महापालिकेच्या कार्यालयालगतच सुरू असलेल्या या बांधकामाबाबत प्रशासन मौन का बाळगत आहे, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे.महाकाली प्रभागातील संबंधित नगरसेवक यांच्याकडूनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.


या बांधकामाला महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, संबंधित अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेतल्याचाही आरोप होत आहे. 

शहरातील अवैध बांधकामांवर कारवाईबाबत प्रशासनाची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप करत, महापालिकेला जाग केव्हा येणार, असा प्रश्नही तिवारी यांनी उपस्थित केला त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments