Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांचा होणार सम्मान

 



✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो. नं.9373472847


भंडारा : (दिनांक ७ जून २०२६ ) सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२६ (सामाजिक क्षेत्र ) ने सन्मानित करण्यात येणार आहे.


 सविस्तर वृत्त असे की, " सन्मान द्या सन्मान घ्या "  ह्या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन  सोहळ्यानिमित्य (दिनांक ९ जून २०२६) रोजी पहेला येथे आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांना  माजी खासदार खुशाल बोपचे, अभिनेते अश्विनकुमार बघाले, अभिनेत्री चैताली भष्मे, दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांचे हस्ते मानाचे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२६ ( सामाजिक क्षेत्र ) ने सन्मानित करण्यात येणार आहे. रजत राऊत यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments