माहूर प्रतिनिधी
आदित्य खंदारे
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या सुविध्य पत्नी सौ.सरस्वती आनंदराव तिडके बोंढारकर यांनी सहपरीवार आंनंद दत्तधाम आश्रमास भेट दिली असता आश्रमाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक मासानिमित्त दिनांक 17मे ते 15जुन याकाळात आश्रमात सुरु असलेल्या भजन कीर्तन, सामाजिक उपक्रमासह चुल बंद अन्नदान महाप्रसाद कार्यक्रमाची त्यांनी माहीती जाणुन घेतली,तसेच महाराष्ट्र शासनाचे ब्रॅड ॲंबेसेडर स्वच्छता दुत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्गदर्शक राष्ट्रसंत व.भ.प.साईनाथ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.तसेच आश्रमाच्या वतीने सुर असलेल्या सेवा प्रकल्प, नित्य अन्नदान अध्यात्मिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
आश्रमात सुरु असलेल्या अधिक मास धोडे जेवन महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी आश्रमातील भाविकांची निस्वार्थ सेवा आणि अध्यात्मिक धार्मिक उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या सप्तसुत्री उपक्रमातुन समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त करुन त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्र संचलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शेषेराव पाटील सर यांनी केले तर आश्रमाचे प्रवक्ते भाउ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments