Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

संघर्षाला हरवून यशाला गवसणी घालणाऱ्या चंद्रपूरच्या लेकीचा अभिमान!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर : - सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक संकटांवर मात करत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या स्नेहा वाघमारे हिची भेट घेऊन तिचा सत्कार आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी केला.


गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला आणि स्नेहाच्या अथक जिद्दीला आज यशाचे सुंदर फळ मिळाले आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे स्नेहा हे जिवंत उदाहरण आहे.


तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments