Type Here to Get Search Results !

३५ वर्षांपासून प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली टाकळी (कुं) ग्रामस्थांनी मानले अधिकाऱ्यांचे आभार




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


परभणी, दि. ११ :- परभणी तालुक्यातील मौजे टाकळी (कुं) येथील सन १९९० पासून प्रलंबित असलेली प्लॉट फेरफार प्रकरणे अखेर निकाली काढण्यात आली. तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याने ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.


ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी चर्चा केली. प्रलंबित फेरफार प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी विशेष बैठक घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून कार्यवाही सुरू केली.


तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, ग्राम महसूल अधिकारी सोपान गुट्टे आणि मंडळ अधिकारी ज्योती अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली.


या पार्श्वभूमीवर टाकळी (कुं) येथील ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी गणेश शिंदे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती.


सत्कार कार्यक्रमात सरपंच मुंजाजी माणिकराव पारदे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम मंचकराव सामाले, गोविंद देशमुख, नारायण राऊत, परमेश्वर बोराडे, बालाजी निवाळे, गंगाधर गडवे, व्यंकटी देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ग्रामस्थांनी सांगितले की, फेरफार प्रकरणांसाठी गेली ३५ वर्षे संघर्ष सुरू होता. अखेर महसूल प्रशासनाच्या पुढाकारामुळे हा दीर्घकालीन प्रश्न निकाली निघून ग्रामस्थांना न्याय मिळाला.

Post a Comment

0 Comments