Type Here to Get Search Results !

टेमुर्डा येथे बिअर बार तसेच देशी-विदेशी दारू विक्री केंद्रांना परवानगी देऊ नये : खा. प्रतिभाताई धानोरकर

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


वरोरा :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की मौजा टेमुर्डा येथील महिला भगिनींनी गावात बिअर बार तसेच देशी-विदेशी दारू विक्री केंद्रांना परवानगी देऊ नये, या मागणीसाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.


महिलांची सुरक्षा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण आणि गावातील सामाजिक सलोखा याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जनतेच्या भावना आणि ग्रामसभेच्या भूमिकेचा आदर राखला गेला पाहिजे, ही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ठामपणे भूमिका घेतलेली आहे.


आणि यासंदर्भातील सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांना सांगून  खासदार प्रतिभाताई यांनी आश्वस्त केले. महिलांच्या सुरक्षिततेशी आणि गावाच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे आस्वासन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments