मनसे पदाधिकार्यांनी राजसाहेबांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा!
जिल्हा ग्रामीण रुग्नालयात रुग्नांची भेट घेऊन केले फळांचे वाटप !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो. नं.9373472847 /8888519894
भंडारा : (दिनांक १४ जून २०२६ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे भंडारा जिल्ह्याच्या वतीने येथील सार्वजनिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मनसे पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवून राजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भंडारा मनसेतर्फे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. येथील सार्वजनिक रुग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांनी रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
तसेच राजसाहेबांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी कामना यावेळी करण्यात आली. या उपक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजबभिये, शहराध्यक्ष नितीन खेडीकर, शहर उपाध्यक्ष शरद साकुरे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम डहाके यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष अतुल उके, पुष्पक मोरे, अमन राऊत, सौरभ (लकी) पाल यांच्यासह मनसेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून व नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments