Type Here to Get Search Results !

सकाळची भटकंती बेतली जिवावर! दोन ज्येष्ठांना उडवून वाहन पसार !




✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847 /8888519894


भंडारा : ( दिनांक १४ जून २०२६ ) राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथील पेट्रोल पंपासमोर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. कुंडलिक अमृत वालदे वय (६३ वर्षे ) व भिवाजी पंढरी बोदेले वय (७०, वर्षे ) दोघेही धारगाव) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना पहाटे ५:४५ वाजताच्या सुमारास घडली.


 मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास दोघेही घरातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. याचवेळी भंडाऱ्याकडून साकोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, एक जण रस्त्याच्या मध्यभागी तर दुसरा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.


घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने तात्काळ गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच धारगाव पोलीस चौकीच्या पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चालक वाहनासह पसार झाला असून अज्ञात वाहनाचे शोध घेण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे धारगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून , राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वेगामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments