Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

"मनोरंजनासोबत समाजप्रबोधन, चंद्रपूरच्या युवा प्रतिभेची नवी ओळख!" : आ.किशोर भाऊ जोरगेवार




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- चंद्रपूरच्या कलाकारांनी समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या गंभीर समस्येवर भाष्य करणारा "तुफान एक नशा " हा चित्रपट साकारला आहे. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित या चित्रपटाच्या प्रोमो स्क्रीनिंग सोहळ्याला उपस्थित राहून कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

    व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती करणारे चित्रपट काळाची गरज आहेत. समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य कलाक्षेत्रात असून, अशा आशयघन कलाकृतींमधून युवकांना प्रेरणा मिळते.

   या प्रसंगी मार्गदर्शन करण्याचा सन्मान लाभला. चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमचा सन्मान करत त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

 

चंद्रपूरच्या मातीतून उभ्या राहणाऱ्या अशा प्रतिभावान कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 

कलेच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा संदेश देणारे प्रत्येक प्रयत्न कौतुकास्पद आहेत. असे मत आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments